आरोग्य सेविका. 
मुंबई

`त्या` आरोग्य सेविका विम्यापासून वंचित; तुटपुंज्या वेतनासह उपचाराचाही भुर्दंड 

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा


मुंबई  : कोरोनाच्या लढ्यात प्रत्यक्ष घराघरांमध्ये जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करणार्‍या आरोग्य सेविकांमधील जवळपास 60 जणींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, नेहमीच दुर्लक्षित असलेल्या या सेविकांना पालिकेकडून कोणतेही विमा संरक्षण दिले नसल्याने कोरोनावरील उपचारासाठी त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. पालिकेकडून मिळणार्‍या तुटपुंज्या वेतनावर घरखर्च चालवण्याबरोबरच आजाराचा खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. 


 आरोग्य सेविकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आरोग्य विमा देण्यात यावा, अशी मागणी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली आहे. मात्र, या मागणीची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. मुंबई महापालिकेकडून राबवण्यात येणार्‍या आरोग्य सेवा घराघरांपर्यत पोहचवण्यामध्ये चार हजार आरोग्य सेविका मोलाची कामगिरी बजावतात. कोरोनाबाबत लोकांमध्ये भितीचे वातावरण असताना आरोग्य सेविकांनी घराघरामध्ये जाऊन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करणे, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हल तपासणे, थर्मल चेकिंग करणे यासारखी प्रत्यक्ष कोरोना रुग्णांच्या संपर्कात असलेली कामे त्यांनी जबाबदारीने केली. ही कामे करण्यासाठी पालिकेकडून सुरुवातीला त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने मिळत नव्हती. त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांना सुरक्षा साधने मिळण्यास सुरुवात झाली. तरीही या कालावधीत जवळपास 60 आरोग्य सेविकांना कोरोनाची लागण झाली. 


मुंबईच्या आरोग्य सेवेमध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार्‍या आरोग्य सेविकांना मात्र पालिकेकडून कोणत्याही प्रकारचा विमा देण्यात येत नाही. त्यातच मिळणार्‍या तुटपूंज्या वेतनामुळे आरोग्य सेविकांना कोरोना तसेच अन्य आजारांवरही स्वखर्चानेच उपचार करावा लागत आहे. 


पालिकेच्या कर्मचार्‍यांना गट विमा योजनेचा फायदा दिला जातो. गटविमा योजना बंद असल्याने त्यांना दोन लाखांचा विमा दिला जातो. परंतु, आरोग्य सेविकांना विम्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनासह अन्य आजारांवर उपचारासाठी आरोग्य सेविकांनाही पालिकेने विमा योजना लागू करावी. 
- अ‍ॅड प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

 

  Health worker deprived of insurance

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

'असे' असेल पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; KDCA कडून प्राथमिक आराखडा तयार, 'या' एमआयडीसीत 30 एकरांत साकारणार

DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले

Ratnagiri Assembly Election Results : साडेनऊ हजार मतदारांनी नाकारले उमेदवार

Umpire Jobs : क्रिकेट अंपायर बनायचं आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि मिळणारी लाखोंची पगार

SCROLL FOR NEXT